Posts

(बालकथा) सत्याचा विजय

एका गावात एक शेतकरी आपल्या मुलीसोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होता. त्याच्याकडे शेती करायला थोडी फार जमीन होती. धान्य, चारा विकून  थोडे फार पैसे मिळायचे, पण त्या पैशांत दोन वेळचे जेवणही करता येत नव्हते. एके दिवशी शेतकरी आपली समस्या घेऊन राजाकडे गेला.राजा खूप दयाळू होता. त्याने आपल्या जमिनीतील काही तुकडा शेतकऱ्याला कसायला दिला आणि सांगितले की ही जमीन आमचीच राहील पण त्यावर जे काही पिकेल ते तुझेच असेल. शेतकऱ्याला फार आनंद झाला आणि राजाचे आभार मानून तो आपल्या गावी परतला. एके दिवशी तो शेतात नांगरणी करत होता. तेवढयात त्याचा नांगर एका कठीण वस्तूमध्ये अडकला. नांगर पुढे जाईना. त्याने त्या ठिकाणी खुदाई केली असता, त्याला सोन्याची उखळ सापडली. शेतकरी खूप प्रामाणिक होता. त्याने आपल्या मुलीला सांगितले की आपल्याला ही सोन्याची उखळ राजाच्या शेतात सापडली आहे. ज्याची जमीन आहे, त्याचीच ही उखळ. म्हणूनच आपण ही उखळ राजाला परत केला पाहिजे. त्याची मुलगी म्हणाली, 'नाही बाबा, असं काही करू नका.राजाने तुम्हाला त्याच्या जोडीचे सोनेरी मुसळ मागितले तर काय करणार? म्हणूनच तुम्ही ही उखळ तुमच्याकडेच ठेवा.' पण शेतकऱ...

वाईटाचा शेवट वाईटच होतो

Image
एका गावात तीन चोरटे राहत होते. एका रात्री त्यांनी एका श्रीमंत माणसाच्या घरी मोठी चोरी केली. त्यांनी सर्व पैसा-अडका, सोनं-नाणं एका पिशवीत भरले आणि जंगलाच्या दिशेने पळाले. जंगलात पोहोचले,पण त्यांना कडाक्याची भूक लागली होती. त्यांच्याजवळ खायला काहीच नव्हते, त्यामुळे त्यातला एक चोर जेवण आणण्यासाठी जवळच्या गावात गेला. उरलेले दोन चोरटे चोरीच्या मालाची राखण करीत जंगलातच थांबले.  जो चोर जेवण आणायला गावात गेला होता, त्याची नियत बदलली. चोरीचा सगळा माल एकट्याने हडपाण्याचा डाव रचला. पहिल्यांदा त्याने हॉटेलमध्ये जेवण केले. नंतर दोघांसाठी जेवण बांधून घेतले. त्यात विष कालावले.  त्याने विचार केला की, जेवणात विष घालून दोघांना मारून टाकू आणि सगळा माल हडप करू. इकडे जंगलातल्या दोघा चोरांनी जेवण आणायला गेलेल्या मित्राचा खून करण्याचा कट रचला. त्यांनी आपल्या वाटेतील अडसर दूर करून सगळा माल दोघांत वाटून घेण्याचे ठरवले होते. पहिला चोर जेवण घेऊन जंगलात आल्यावर दोघांनी मिळून त्याच्यावर काठ्या-कुऱ्हाडयांनी हल्ला केला आणि त्याला मारून टाकले. तो मला आहे, याची खात्री केल्यावर दोघेही शांतपणे जेवायला बसले. पण ...